Hiकोरोना महामारीच्या काळात कार्य करणार्या महिला पोलिसांचा सत्कार रोटरी क्लब कर्वेनगर, सारसबाग व ईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. दामले हॉल लॉ कॉलेज रस्ता येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मा.आ.मेधाताई कुलकर्णी, रोटरी प्रांत ३१३१ चे नियोजित प्रांतपाल रो.पंकज शहा रोटरी कर्वेनगरच्या अध्यक्षा रो.अॅ.आकांक्षा पुराणिक, रो.सारसबागच्या अध्यक्षा रो.जयश्री देशपांडे, रोटरी ईस्टच्या अध्यक्षा रो.जया शहा, व्होकेशनल डायरेक्टर रो.गौरी शिकारपूर, व्होकेशनल चेयर रो.शिरीष पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते. सत्कारार्थी- किरण मदाने पोलिस निरीक्षक सहकारनगर, छायाताई गादीलवाड पोलिस सब इन्स्पेक्टर बिबवेवाडी, सुनंदा शहाणे महिला पोलिस हवालदार सहकारनगर, वृषाली पाटील-कुलकर्णी सहाय्यक पोलिस निरीक्षक कोथरूड, मानपत्र व भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते. कोविड काळात कार्य करणार्यांसाठी कृतज्ञता म्हणून याचे आयोजन केल्याचे रो.आकांक्षा पुराणिक यांनी नमूद केले. सत्काराला उत्तर देताना महिला पोलिसांनी “पुरुष व महिला दोघे एकाच प्रकारची ड्यूटी करतात मात्र महिला पोलिसांना एक कर्तुत्ववान महिला व एक आई म्हणून, तसेच कधी कधी तर दूर राहून ड्यूटी व बाळांचे संगोपन करावे लागले, ही तारेवरची कसरत होती”. अशा भावना व्यक्त केल्या.
छायाचित्र :सत्कारार्थी व मान्यवर यांचे समूहचित्र.