पुण्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर युवासेना पुणे यांच्या वतीने हिंदुहृद्यसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यस्मृती प्रीत्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मोदी गणपती चौक येथे संपन्न झालेल्या या शिबिरात सुमारे २३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, निरंजन दाभेकर (युवा सेना विभाग प्रमुख),नगरसेवक विशाल धनवडे, सविता बलकवडे कुणाल धनवडे, राम थरकुडे, चेतन चव्हाण, कल्पेश यादव, दशरथ खिरीड, सविता मते,शर्मिला येवले, मनीषा वाघमारे, राजेश पळसकर, विशाल सातव, अनिल येनपुरे, वैभव सुतार आदी मान्यवर व पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.या शिबिरात रक्त शर्करा तपासणी व रक्तदाब तपासणी करण्यात आली तसेच नेत्र तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले.
छायाचित्र : रक्तदान प्रसंगी मान्यवर.