युवासेवेसाठी सदैव तत्पर सेवेत..!
काल रात्री इतकी भयानक परिस्थिती येवून पोहोचली होती कोविड-19 “Positive” पेशंट ची..!
पुण्यातील कुठल्याच कोविड सेंटरला व हॉस्पिटल ला कोविड-19 पेशंटला कुठेच बेड उपलब्ध नाही अत्यंत भयानक परिस्थिती कोविड रुग्णाशी होत आहे युवा नेते रोहित कुचेकर यांनी “कोविड-19” पेशंट ला ससून हॉस्पिटल मध्ये Admit केले पेशंट ऋषिकेश महादेवराव ठक राहणार अकोला गेली ४ दिवस कोविड -19 त्रासांशी जूंजत होता पुण्यातील हडपसर काळेपडळ भागात Job करत असलेला ठिकाणी याला खरच खूप गरज होती उपचाराची याची जाणिव ठेवून त्याचे मित्र पंकज परमार आणि युवासेनेचे युवानेते रोहित कुचेकर यांनी त्या रूग्णांला लवकरात लवकर ससून हॉस्पिटल येथे घेवून गेले.
पंकज परमार राहणार काळेपडळ यांनी युवासेनेचे युवानेते रोहित कुचेकर यांना काल रात्री ९:०० चा आसपास फोन केला कोविड -19 पेंशट ची माहिती दिली युवानेते रोहित कुचेकर लगेच काळेपडळ याठिकाणी गेले सध्या job करत असलेल्या ठिकाणी पाहिले कोविड पेशंट ची अत्यंत गंभीर भयानक परिस्थिती होती रोहित कुचेकर यांनी लगेच राष्ट्रवादीचे कार्यक्षम नगरसेवक योगेश बापू ससाणे यांचाशी संपर्क केला बापू नी सांगितले की,बनकर कोविड सेंटर ला रूग्णांला घेवून जा असे सांगितले ? पण तो रूग्ण व्हेटिलेटर चा रूग्ण असल्याने तेथे Admit करता आले नाही पेंशट चा Oximetre 79 पर्यंत पोहचला होता ऑक्सिजन ची त्याला खूप गरज होती तेथील डाॅकटरांनी त्याची परिस्थिती खराब आहे असे सांगितले आम्ही तातडीने Ambulance ची सुविधा शिवसेनेचे कार्यक्षम नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांचा कार्यकर्त्याने अभिजीत बाबर यांनी Ambulance सुविधा उपलब्ध करून दिली यांचा मूळे रूग्णास रात्री जेवढ्या लवकर हलवतां आले तेवढे आम्ही हालवले व ससून हॉस्पिटल पुणे येथे घेवून गेलो बेड उपलब्ध नव्हता पण त्या ठिकाणी रूग्णांशी परिस्थिती गंभीर होत चालेली होती काहीतरी करून डाॅकटरांशी request केली त्याला तातडीने admit केले सुदैवांने त्याचावर उपचार सुरू केले गेले राष्ट्रवादीचे कार्यक्षम नगरसेवक योगेश बापू ससाणे यांनी आम्हाला वेळातला – वेळ काढून रात्री १२:३५ सुमारास फोन वर रूग्णाचा परिस्थिती बददल माहिती घेतली त्यांनी कोविड -19 रूग्णांशी जेवढी मदत करता आली त्यांनी करत होते नाईलाजने बेड शिल्लक नसल्या मूळे बापूंनी विश्वकर्मा नाव सुचविले पण डाॅकटरांचा सल्लानूसार आम्ही ससून हॉस्पिटल मध्ये घेवून गेलो
माझा युवा-सेवाम् फाऊंडेशन चा माध्यमातून जेवढी जबाबदारी घेता आली तेवढी जबाबदारी माझे सहकारी मित्र पंकज परमार आणि शिवसेना -युवासेना हडपसर विधानसभा मतदार संघाचे युवानेते रोहित कुचेकर दोघांनीही सकाळी ५:३० वाजे पर्यंत तिथेच रूग्णांसोबत थांबले त्याचा कुटूंबाशी आमचे बोलणे होत होते वडीलांशी संपर्क झाला आहे आज ११:०० वाजे पर्यंत पोहोचतील म्हटले होते ससून हॉस्पिटल पुणे येथे येतील असे सांगितले सुदैवाने त्याची परिस्थिती बऱ्यापैकी ठीक आहे.
– रोहित सुभाष कुचेकर
सहसचिव : सा.फुले पुणे विद्यापीठ (पुणे शिरूर लोकसभा)
युवा-सेवाम् फाऊंडेशन