“ भारतात गुरु शिष्य परंपरा प्राचीन आहे. गुरु म्हणजे देव आणि शिष्य यांच्यातील दुवा असतो. गुरु योग्य ते मार्गदर्शन करून संसारीक व आध्यात्मिक विकास घडवतो म्हणून सद्गुरूंच्या चरणी श्रद्धा व भक्ति असावी”. असे प्रतिपादन सुधांशुजी महाराज यांनी केले.ते विश्वजागृती मिशन आयोजित गुरुपोर्णिमा, गुरुपूजन,व सत्संग(उपदेश) कार्यक्रमात मार्गदर्शन करीत होते. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी घनश्याम झंवर, विष्णु आगरवाल, गणेश कामठे, रवींद्रनाथ द्विवेदी, शाम मरळ, जगदीश अग्रवाल, आदी मान्यवरांच्या बरोबरच मोठ्या संखेने भक्तगण उपस्थित होते.
छायाचित्र : डावीकडून रमेश आगरवाल,जगदीश आगरवाल,घनश्याम झंवर,विष्णु अग्रवाल, गणेश कामठे,रवींद्र नाथ द्विवेदी,शाम मरळ.