सुंदरादेवी राठी हायस्कूल,मित्रमंडळ सोसायटी पर्वती गाव (सरिता विद्यालय) पुणे येथील शाळेच्या टेरेसवर बी.एस.एन.एल या मोबाईल कंपनीचा अनधिकृत टॉवर गेल्या १३ वर्षापासून आहे.तरी त्या टॉवर मुळे लहान मुलांना व आजारी व्यक्तींना कमी प्रतिकार शक्तीमुळे किरणोत्सर्गाचा त्रास संभवतो.यावर असे टॉवर महापालिकेची परवानगी न घेता उभारले आहे.ते न काढल्यास याविरुद्ध राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा नारायण तेलंग –संघटक सचिव महाराष्ट्र प्रदेश कामगार सेल यांनी व अतुल गायकवाड,गणेश घोलप,अनिरुद्ध मैड,आदींनी पत्रकात दिला आहे.
सोबत :- निवेदनाच्या प्रती.
छायाचित्र :अनधिकृत टॉवर.