सुर साधना संगीतच्या ९२ विद्यार्थी विद्यार्थिंनिंचा पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न. यात वय वर्ष ४ ते २० वर्ष वयाच्या ९२ विद्यार्थ्यांचा सत्कार पदक व प्रमाणपत्र देवून करण्यात आला. सिंबायोसिस विमाननगर येथील सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी संस्थापक आकाश बाघ, शास्त्रीय संगीततज्ञ शरद रोंघे, कर्नल बिस्ट (रिटा.), आरती वाघ( माहिती तंत्रज्ञान), विपिन कुमार (संगीत शिक्षक), सूरज नागणे(संगीत शिक्षक) आदी मान्यवरांच्या बरोबरच पालक उपस्थित होते. या प्रसंगी शरद रोंघे व कर्नल बिस्ट यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यानी हिन्दी व इंग्रजी भाषेतील गाण्यांवर गिटार,ड्रम,पियानो यांचे वादन व गायन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बहुसंख्य विद्यार्थ्यानी हे संगीत शिक्षण कोविड काळात ऑनलाईन पद्धतीने घेतले आहे.
छायाचित्र : विद्यार्थी व मान्यवर यांचे समूह चित्र