सुलोचना दीदींना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळण्यासाठी मोहीम उभारणार मनसे चा इशारा

Share This News

आज सुलोचना दीदींचा वाढदिवस. त्यांनी 93 व्या वर्षात आज पदार्पण केले.सुलोचना लाटकर यांनी 1943 पासून भालजी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर एका मागून एक असे अनेक चित्रपटातून ओळख निर्माण केली. त्यांच्या कारकिर्दीत आईच्या भूमिकेसाठी विशेष ओळख मिळाली. त्यांना चित्रभूषण आणि महाराष्ट्र भूषन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अब दिल्ली दूर नही, कटी पतंग, संपूर्ण रामायण, मराठा तितुका मेळवावा अशा अनके चित्रपटात त्यांनी अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.अश्या या माऊलीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा.
प्रख्यात मराठी अभिनेत्री सुलोचना लाटकर म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या सुलोचनादीदी यांना केंद्र सरकारने मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव करावा अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मागे करण्यात आली होती. याविषयीचं सविस्तर पत्रही माहिती प्रसारण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांना देण्यात आलं होत.तरीदेखील तमिळनाडू च्या निवडणुका लक्षात घेवून मतांच्या बेगामीसाठी सत्ताधाऱ्यांनी रजनीकांत यांना तो पुरस्कार दिला.मराठी माणसाच्या चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी चालू झालेला पुरस्कार 50 वर्ष चित्रपट सृष्टीची सेवा करणाऱ्या 92 वर्षांच्या
दीदींना कर्तृत्व असून देखील आजपर्यंत डावललं गेलं याच वाईट वाटतं.दादासाहेब फाळके कुठचे आहेत? बॉलिवूड कुठे आहे? मग महाराष्ट्रातील कलावंतांकडे दुर्लक्ष का होते याचा विचार करायला हवा.
एखाद्याला किती काळ वाट पाहायला लावायची, एक प्रतिभावान दिग्गज अभिनेत्री म्हणून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत काळ गाजवला आहे. एखादी भूमिका दाखवा ज्यामध्ये त्यांनी आपले अभिनय कलेचे प्राण ओतले नाहीत. अनेक चित्रपटातून अभिनेत्याच्या आईची भूमिका वटवत वेगळी ओळख चित्रपट सृष्टीत निर्माण केली आहे. तसेच देशातील राष्ट्रापतीच्या हस्ते सर्वाधिक गौरव झालेल्या त्या एकमेव अभिनेत्री आहेत. असे असताना दादासाहेब फाळके पुरस्कारापासून त्या वंचित असल्याचे पाहून वाईट वाटते.
देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना प्रश्न आहे की, जेव्हा राष्ट्रपती भवनात बॉलिवूडच्या कलाकारांना दिल्लीत बोलावले जाते, तेव्हा एकही मराठी कलाकार त्यामध्ये का नसतो? शरद पोंक्षे, विक्रम गोखले, अशोक सराफ, सुबोध भावे यांचे नाव कोणाला माहीत नाही का? सरकारला माहीत नाही का? चित्रपटसृष्टी म्हटले की मराठी कलाकारांना स्थान असलेच पाहिजे ते विसरून चालणार नाही.
1969 पासून सुरू झालेला दादासाहेब पुरस्कार आतापर्यंत 44 पुरुषांना देण्यात आला आहे. तेच महिलांच्या विचार केल्यास केवळ 6 महिलांचा समावेश आहे. पुरुष प्रधान संस्कृतीकडून महिला प्रधान संस्कृतीकडे वाटचाल करतांना हा सुलोचना लाटकर यांना देऊन नवीन प्रथेला सुरवात करायला हवी. इतर पुरस्कार देताना चित्रपटात अभिनेता आणि अभिनेत्रीना पुरस्कार दिला जातो. त्याचा प्रमाणे विभाजन करून फाळके पुरस्कार हा महिला आणि पुरुष असे दोन पुरस्कार दिले असते तर दीदींना रजनीकांत यांच्याबरोबर हा पुरस्कार देता आला असता.
गेली अनेक वर्ष सातत्याने ही मागणी जोर धरत असताना आता तरी सरकारने गांभीर्यपूर्वक या मागणीचा विचार करावा ही विनंती आणि त्यासाठी जनमाणसातून ही मागणी होणे गरजेचे आहे आपल्या मराठी माणसाच्या कर्तृत्वासाठी-उत्कर्षासाठी.
यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे लवकरच मोहीम राबवली जाईल.