श्रीमाली ब्राह्मण समाज महालक्ष्मी मंदिराचा सुवर्ण महोत्सवी पाटोत्सव उत्साहाने संपन्न.

Share This News

पुणे (दि.९) श्रीमाली ब्राह्मण समाज महालक्ष्मी मंदिर येथे ५० वा सुवर्ण महोत्सवी पाटोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला.या प्रसंगी श्री महालक्ष्मी देवीची आरती, भव्य शोभा यात्रा, सुशोभित चित्ररथ, यांचा समावेश होता.तसेच शिव पर्वती विवाह सोहळा नाट्य सादर करण्यात आले. या प्रसंगी डॉ.गुरुदत्त दवे शर्मा (अध्यक्ष), शरद नर्तेकर (ट्रस्टी), डॉ.अरुण जोशी ट्रस्टी, आ.हेमंत रासने, आ.सुनील कांबळे, गौरी बिडकर, मा.आ.मोहनदादा जोशी. मा.आ रमेश बागवे, गजानन मुनीश्वर(अध्यक्ष श्री अंबाबाई महालक्ष्मी श्रीपूजक), गुरुजी सतीश वैद्य( त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नासिक), गुरुवर्य डॉ.माणिकमहाराज मुखेकर(आळंदी). आदी मान्यवरांच्या बरोबरच शेकडो भाविक नागरिक स्त्री पुरुष पारंपारिक वेशात उपस्थित होते.
छायाचित्र : श्री महालक्ष्मी आरती प्रसंगी मान्यवर.