पुणे (दि.७)रा.स्व. संघाचे भैय्याजी जोशी यांनी मराठी विषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्यावर संताप झालेल्या शिवसेनेच्या(ऊबाठा) वतीने रमणबाग येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास जोड्याने मारण्यात आले. व निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या आंदोलन प्रसंगी शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राजेंद्र शिंदे, अनंत घरत, संतोष गोपाळ, रुपेश पवार, अमोल घुमे, बकुळ दाखवे, प्रशांत राणे, संदीप गायकवाड, ज्ञानंद कोंढरे, मिलिंद पत्की, पंकज परदेशी, नितीन परदेशी, विद्या होडे, अमृत पठारे, सोहम जाधव, चिंतामणी मुंगी, संतोष भूतकर, स्वाती कथलकर, अमोल निकम, मंदार निकम, दिलीप पोमण, संजय लोहट, राहुल शेंडगे, विकी धोत्रे आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी, व शिवसैनिक उपस्थित होते.