- जंजीरा वेल्फेअर फाउंडेशन व लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंती निमित्त रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले.याचे उद्घाटन शिवसेना उपनेते व कामगार सेना सरचिटणीस रघुनाथ कुचीक यांच्या हस्ते करण्यात आले.हा कार्यक्रम आठ दिवस सुरू रहाणार आहे.या कार्यक्रम प्रसंगी जंजीरा फाऊंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन हेमंत कुलकर्णी,लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ.श्रीकृष्ण जोशी,सुनील काळे,शिरीष फडतरे माजी शिक्षण मंडळ पुणे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.सद्य: स्थितीतील कोविड १९ मुळे उद्भवलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी भव्य असा १००० रक्त पिशव्या संकलन करण्याचा मानस असल्याचे आयोजक कॅप्टन हेमंत कुलकर्णी यांनी नमूद केले.
छायाचित्र :रक्तदात्यास प्रमाणपत्र देताना रघुनाथ कुचिक हेमंत कुलकर्णी व अन्य मान्यवर.