*महिला भगिनींचा अपमान करणाऱ्या संजय राऊतच्या निषेधार्थ शिवसेनेचे निषेध आंदोलन..!*

Share This News

*उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी आमच्या नेत्या डॉ. निलमताई गोऱ्हे यांच्याविषयी अश्लाघ्य भाषेत बरळले असून एका महिला भगिनीचा संजय राऊत याने अपमान केला आहे. महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य उबाठा चे नेते कायम करत असतात. सुसंस्कृत आणि साहित्याबद्दल ज्ञान पाजळणाऱ्या संजय राऊत ने महाराष्ट्रातही तमाम महिला भगिनींचा अपमान केला आहे. संजय राऊत याच्या निषेधार्थ आज अलका टॉकीज चौक, डेक्कन येथे निषेध आंदोलन करण्यात आले. नीम का पत्ता कडवा है, संजय राऊत भडवा है. या संजय राऊत च करायचं काय खाली डोक वर पाय अशा घोषणांनी शिवसेनेच्या वतीने संजय राऊतचा निषेध करण्यात आला.*
*त्याकाळात शिवसेनेत कशा प्रकारे काम चालायचं याबाबत निलम ताईंनी भूमिका मांडली. तोच अनुभव मला पुणे महापालिकेचा नगरसेवक असताना आला. शिवसेना (उबाठा) चे तत्कालीन संपर्क प्रमुख बाळा कदम यांनी स्थायी समिती सदस्य होण्यासाठी माझ्याकडे 25 लाखांची मागणी केली होती आणि 5 लाख दिल्याचे माझ्याकडे पुरावा देखील आहे. त्यामुळे मला जास्त बोलायला लावू नका, संजय राऊत यांनी कोणाकडून किती पैसे घेतले हे लवकरच जाहीर करू आणि त्यांचा बुरखा फाडू.*

*संजय राऊत कायम खालच्या पातळीवर जाऊन अश्लाघ्य भाषेत टीका करत असतात. उबाठाच्या या वाचाळवीर संजय राऊत ला वेळीच आवर घाला नाहीतर यापुढे जर शिवसेनेच्या नेत्यांवर अश्लाघ्य भाषेत काही बोलला तर प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिक संजय राऊतला महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही.*
*या निषेध आंदोलनात शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, बारामतीचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे, महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख सुदर्शना ताई त्रिगुनाईत,उपशहर प्रमुख विकास भांबुरे, शहर संघटक श्रीकांत पुजारी,आकाश रेणुसे, युवराज शिंगाडे,मार्तंडराज धुंदुके, कामगार सेना शहर प्रमुख संदीप शिंदे,गणेश काची,निलेश जगताप,श्रुतीताई नाझीरकर, रंजना कुलकर्णी, चैत्राली गुरव व शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना,अंगिकृत संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*