पुणे (दि.२०) मराठा आरक्षण विधेयक पारित झाल्या बद्दल शिव कामगार सेनेच्या वतीने विधानभवन समोर जल्लोष करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे यांचे आभार मानले. यासाठी पुणे येथील कामगार व पदाधिकारी उपस्थित होते.शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, शिव कामगार सेनेचे अध्यक्ष सुधीर कुरुमकर,शिव कामगार सेना प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र सोनार.प्रमोद राणा,अप्पा माने,श्री निलेश कणसे, श्री पाटील व अन्य कामगार वर्ग उपस्थित होता. यावेळी गुलालाची उधळण,ढोली बाजा, फटाके व एक मराठा लाख मराठा या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या सर्व कामगारांनी विधान परिषद उपसभापती मा.ना.डॉ.गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली. छायाचित्र :जल्लोष प्रसंगी नरेश म्हस्के,सुधीर कुरुमकर व अन्य.