आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि प्रचंड स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी समर्थपणे उभे रहावे व त्यांना योग्य ते प्रशिक्षण मिळावे यासाठी डॉक्टर अमित आंद्रे यांनी ज्ञानशा या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. हे कोर्सेस कॉम्प्युटर , इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, फिजिक्स आणि गणिताच्या पदविका ,पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आहे . एक सामाजिक उपक्रम म्हणून हे विनामूल्य सुरु केले आहेत . हे कोर्सेस खालीलप्रमाणे आहेत . 1. Cloud Technology Essentials including Hands-On Lab Exercise 2. Implementing AI/ML using Cloud Services-With Hands-On Lab Access 3. Data Analytics for HR/L&D 4. Organization Wide Cloud Skills Analysis to identify and forecast gaps with ROI 5. Learning Needs Analysis महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हे कोर्सेस अतिशय उपयुक्त आहेत कारण नवीन तंत्रज्ञान शिकण्यासोबतच इंटर्नशिप करण्याची संधी त्यांना मिळणार आहे तसेच त्यांना प्रमाणपत्र ही प्राप्त होईल . शिका आणि कमवा या धर्तीवर हे प्रशिक्षण घेता येईल आणि 10000 $ पर्यंत ची बक्षिसे जिंकण्याची सुद्धा संधी आहे . आर्थिक दृष्ट्या दुर्बल पण होतकरू विद्यार्थ्यांना हे अद्ययावत तंत्रज्ञान विनामूल्य शिकता यावे हा त्यांचा प्रमुख उद्देश्य आहे . तरी कृपया या उपक्रमाची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेन्ट ऑफिसर , महाविद्यालयातील Head of the department आणि प्राध्यापकांपर्यंत पोहचवावी जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल . अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधावा https://learning.tdtl.world/cloudfundamentals/ वरील संपूर्ण माहिती सौ. प्राची आंद्रे, वाईस प्रेसिडेंट, ‘डेटा टेक लॅबस्’ यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे.
ज्ञानाशा संस्थेतर्फे मोफत प्रशिक्षण कोर्सेस
Tags: #aaj ka anand, #lokmat, #loksatta, #maharashtratimes, #pudhari, #punya nagri, #rotarydist3131, #sakal, #samna