कोव्हीडच्या दुसर्या लाटेत वैद्यकीय क्षेत्रांत अनेक जण सेवा देत आहेत. त्यांना प्रोत्साहन म्हणून रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्ट तर्फे नर्सेस दिनाचे निमित्त साधून सर्व कोव्हिड योद्ध्यांचा सन्मान केला. नाजुश्री कोविड सेंटर मधील डॉक्टर्स, नर्सेस, रुग्ण वाहिका कर्मचारी, सफाई कामगार, केटरिंग व्यवस्था पाहणारे, असे ५१ जणांना प्रमाणपत्र व छोटीशी गिफ्ट देवून सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी रोटरी क्लब ईस्टचे अध्यक्ष रो जया शहा, प्रोजेक्ट चेअरमन रो दिनेश बोराणा, सचिव रो.संपदा जोशी, अचल जैन, विजय राठोड, नरेंद्र शहा, अभय जोशी, व क्लब सदस्य उपस्थित होते.
छायाचित्र : समूह चित्र