रोटरी क्लब युवाच्या अध्यक्षपदी निनाद जोग यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष सत्यजित निगडे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली. सचिवपदी अर्चिता मडके यांची निवड करण्यात आली. मराठा चेंबर्सच्या सुमंत मुळगावकर सभागृह यथे संपन्न झालेल्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे नियोजित प्रांतपाल शितल शहा, सहाय्यक प्रांतपाल किरण इंगळे आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी, सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना नवनिर्वाचित अध्यक्ष निनाद जोग यांनी आगामी काळात निर्माल्य श्रेडींग, पर्यावरण, शिक्षण, व आरोग्य विषयी विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले
छायाचित्र : निनाद जोग.