रोटरी क्लबचे नवीन वर्ष सुरू होतांना पदग्रहण समारंभ होत असतो. यात बराच खर्च होत असतो.रोटरी क्लब कर्वेनगरने यावर्षी या समारंभास होणारा खर्च टाळून त्या पैशाने चिंचवड येथील समरसता गुरुकुलम येथे २ वॉटर प्यूरीफायर व तेथील मुलींसाठी १००० सॅनिटरी नॅपकीन प्रदान केले. या पदग्रहण समारंभात मनीषा पुराणिक यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष डॉ.दिलीप कुलकर्णी यांच्या कडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. सचिवपदी दीपक थिटे यांची निवड करण्यात आली. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री गिरीश प्रभूणे होते. समरसता गुरुकुलम येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक प्रांतपाल वासवी मुळे,शिरीष पुराणिक आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना नवनिर्वाचित अध्यक्ष मनीषा पुराणिक यांनी आगामी काळात हॅप्पी आंगणवाडी व पेडियाट्रिक हार्ट सर्जरी व अन्य समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा आमोणकर यांनी केले.
छायाचित्र : वॉटर प्यूरिफायर प्रदान करतांना मान्यवर.