रोटरी क्लब डेक्कन जिमखानाच्या वतीने विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी करणार्यांचा व्होकेशनल एक्सलन्स( व्यावसायिक गुणवत्ता)पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब डेक्कन जिमखानाचे अध्यक्ष रो.डॉ.अमित आंद्रे, रोटरी क्लब एनआयबीएमचे अध्यक्ष मनोज भाटे, रोटरी क्लब डेक्कन जिमखानाचे सेक्रेटरी रो.डॉ. उमेश फालक, एनआयबीएमचे सेक्रेटरी पद्मश्री ऊपळे, भरत दाभोळकर(नाटक), दिपा भाजेकर (सामाजिक कार्यकर्ता), अतुल काळे (नाटक), अंकुर काकतकर (नाटक), पियुष कुलकर्णी(नाटक) आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नावे पुढील प्रमाणे,-१)किशोर राऊत(उद्योजक), २)शंकर साळुंखे(एच आर), ३)काशीनाथ देवधर(शास्त्रज्ञ), ४)केतन कपूर(एच आर), ५)शिरीष मोहिते(समाजसेवा), ६)प्रमोद बलकवडे(आपत्ती व्यवस्थापन), ७)डॉ.मंगल कर्डीले(वैद्यकीय). मानपत्र व रोप असे पुरस्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी बोलतांना अमित आंद्रे यांनी समाजात आपापल्या क्षेत्रांत उत्तम सेवा करणार्यांचा सन्मान करून त्यांना पुढील कार्यात स्फूर्ति मिळावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे संगितले.
छायाचित्र : मान्यवर व पुरस्कार प्राप्त यांचे समूहचित्र