रोटरी क्लब विजडमच्या वतीने संपर्क स्कूल भांबर्डे ता.मुळशी या निवासी शाळेस रोटरीच्या “हॅप्पी स्कूल” प्रकल्पांतर्गत विविध मदत करण्यात आली. यात शाळेतील २६५ विद्यार्थी विद्यार्थिनींना स्टील बंक बेड दुरूस्ती करण्यात आली, यात लाकडी प्लायवूड बसविणे, त्याचे संपूर्ण रंगकाम करण्यात आले. शाळेतील कपाटे, बाक,स्टूल यांची दुरूस्ती व रंगकाम. तसेच २६५ गाद्या उशा त्यांची कव्हर्स बेड शिट चादरी हे देण्यात आले. याच बरोबर ३०० व्यक्तींच्या स्वयंपाकासाठी लागणारे सर्व साहित्य जसे भांडी कुंडी व यंत्र सामुग्री देण्यात आली. या विद्यार्थ्याच्या खेळासाठी बैठ्या व मैदानी खेळाचे साहित्य प्रदान करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब विजडमचे अध्यक्ष रो. हेमंत पुराणिक, संपर्क संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित बॅनर्जी, माजी अध्यक्ष रो.राहुल चौधरी, रो.वैशाली वर्णेकर, प्रकल्प संचालक राजेश वाडेकर आदी मान्यवरांच्या बरोबरच २५ रोटरी सदस्य व संपर्क संस्थेचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.या प्रकल्पासाठी सुमारे १० लाख रु खर्च करण्यात आला.
छायाचित्र :विद्यार्थी व मान्यवर यांचे समूहचित्र.