जागतिक मधुमेह दिनानिमित्त २९ सप्टेंबर रोजी रोटरी युवा तर्फे अतिदुर्गम आशा खेड्या गावात जाऊन उच्चांकी मधुमेह तपासणी मोहीम राबविली ज्या गावांमध्ये वैद्यकीय सुविधा किंवा वैद्यकीय चाचणी सहजासहजी उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी पोहोचून सदरील अभियान राबवण्यात आले तसेच शहरातील वृद्धाश्रम आणि विकलांग समूहासाठी विशेष वैद्यकीय पथकाने मधुमेह चाचणी शिबिर आयोजित केले शिबिरात एकूण ६८३ जणांची चाचणी करण्यात आली एकाच वेळी एकूण सहा ठिकाणी मधुमेह शिबिर आयोजित करण्यात आले होते ह्यासाठी अध्यक्ष तृप्ती नानल, अजय कुलकर्णी , निनाद जोग व श्रीकांत जोशी ह्यांनी विशेष प्रयत्न केले
छायाचित्र : दिव्यांग व्यक्तीची मधुमेह तपासणी करताना