सैनिकांसाठी रोटरी क्लबने आयोजित केले रक्तदान शिबीर

Share This News

देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य वर्षानिमित्त रोटरी क्लब टिळकरोडच्या पुढाकाराने ६ क्लब एकत्र येवून सैनिकांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यासाठी डिफ्रंट स्ट्रोक्स फौंडेशनने सहाय्य केले. सेवासदन हायस्कूल एरंडवणा येथे संपन्न झालेल्या या रक्तदान शिबीर प्रसंगी सहाय्यक प्रांतपाल रो.हेमंत जेरे, रोटरी टिळकरोडच्या अध्यक्ष रो. अपर्णा क्षीरसागर, रोटरी स्मार्ट सिटी अध्यक्ष रो.शांतिभूषण सूर्यवंशी, रोटरी फोरच्यून अध्यक्ष रो.असित शहा, रोटरी पाषाण अध्यक्ष रो.अवनी धोत्रे, रोटरी मिडटाऊन अध्यक्ष रो.पराग सुरा, रोटरी कोथरूड अध्यक्ष रो सत्यजित चितळे, डिफ्रंट स्ट्रोक्स फाऊंडेशनचे पर्णल देखणे आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या शिबिरात ७० रक्तदात्यांनी रक्तदान केले. आर्म्ड फोर्सेस मेडीलकल कॉलेज रक्तपेढीने शिबिराचे तांत्रिक संचालन केले.    

छायाचित्र :रक्तदान शिबीर प्रसंगी मान्यवर.