राष्ट्रीय समाज पक्ष पुणे शहराच्यावतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २१६ व्या जयंती निमित्त ७०० (सातशे)रिक्षाचालकांसाठी मोफत पी.यु.सी. अध्यक्ष विनायक रुपनवर यांच्यावतीने काढून देण्यात आला. तसेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी विनायक रुपनवर,राज्यमंत्री दत्तामामा भरणे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोकरे, पुणे शहर संपर्क प्रमुख अंकुश देवडकर, उपाध्यक्ष बालाजी पवार, महिला उपाध्यक्ष सुनीताताई किरवे, कायदे सचिव राजेश लवटे, सल्लागार अॅड.बापूसाहेब डोबाले, संजय माने, श्रद्धाताई कदम, महादेव देवडकर, पिंटू केरूले, नामदेव सुले आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
छायाचित्र :राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करताना मान्यवर.