पोंगल निमित्त कलाक्षेत्रम आयोजित ४५ दिवसीय पोंगल महोत्सवात सुमारे १० हजार पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला.यातील १० भाग्यवान महिलांसाठी पैठणी साडी भेटच्या बक्षिसांची निवड अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी कलाक्षेत्रमचे मुख्य प्रतिंनिधी सागर पासकंटी यांनी पोंगल महोत्सव व त्यामागचा उद्देश याची माहिती दिली.या कार्यक्रम प्रसंगी सागर पासकंटी,रोहन आयतम,सचिन गरदास,हितेश आयतम,संतोष आयतम,विलास सातपुते,अंबर क्षिऱसागर,सुप्रिया ताम्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलतांना तेजस्विनी पंडित यांनी पैठणी साडी हा महिलांचा आवडीचा विषय असून कोणत्याही वयाची महिला यात शोभून दिसते असे संगितले.
छायाचित्र : तेजस्विनी पंडित व मान्यवर.