पुणे मॅनेजमेंट असोसिएशनच्या ४७ व्या स्थापना दिनानिमित्त उद्योग – व सामाजिक क्षेत्रांत उत्तम कार्य करणार्या संस्थांचा उद्योजक गणेश नटराजन व पद्मश्री प्रतापराव पवार यांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. एमईएस सभागृह मयूर कॉलनी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी पुना मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटील, उपाध्यक्ष प्रदीप तुपे, उपाध्यक्ष संजय गांधी, सहसचिव अभिजीत खुरपे आदी मान्यवरांच्या बरोबरच उद्योग व सामाजिक कार्य क्षेत्रांतील मान्यवर व उद्योजक मोठ्या संखेने उपस्थित होते. सन्मानित संस्था पुढील प्रमाणे. १)बेस्ट स्टार्टअप – ड्रोन आचार्य, २)बेस्ट फर्स्ट जनरेशन एंटरप्राइज – एंटरप्रेन्यूअल फॅसिलेशन सेंटर EFC, ३)बेस्ट सोशल इंपॅक्ट – सेवा सहयोग, ४) बेस्ट एज्युकेशनल इंस्टिट्यूट – एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी(IOIT) ५) एक्सलंस इन लिडरशिप डेव्हलपमेंट अॅकाडमी – रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ६)बेस्ट वुमन लिड एंटरप्राइज – केसरी टुर्स अँड ट्रॅव्हल्स, ७)एक्सलन्स इन हँड होल्डिंग – लघु उद्योग भारती. या संस्थांच्या प्रतींनिधींनी सत्कार स्विकारला. या प्रसंगी बोलतांना गणेश नटराजन यांनी देशाचा विकास होत असतांना आर्थिक विषमता सुद्धा दूर झाली पाहिजे असे संगितले. पद्मश्री प्रतापराव पवार यांनी विज्ञान – तंत्रज्ञान याचा फायदा थेट कृषी क्षेत्राला मिळाला पाहिजे असे प्रतिपादन केले.
छायाचित्र : पुरस्कार वितरण प्रसंगी मान्यवर.