*मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅसच्या वतीने 2025 साठी सक्षम महोत्सव (संरक्षण क्षमता महोत्सव) जाहीर* 14 ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान संपूर्ण देशभर महोत्सव साजरा होणार

Share This News

पुणे : मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅसच्या वतीने 2025 साठी संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम योजना ) जाहीर करण्यात आली आहे. या योजनेची सविस्तर माहिती हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद सावजी, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रसाद सावजी म्हणाले, “दरवर्षी हा महोत्सव घेण्यात येतो. या महोत्सवातील 15 दिवसात विविध उपक्रम यामध्ये राबवले जाणार आहे. यात 23 फेब्रुवारी 2025 रोजी पुण्यात पिंपरी चिंचवड येथे सायक्लो थँनचे आयोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त विविध महाविद्यालयात तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी गट चर्चा, महावि‌द्यालयांमध्ये भिंतीचित्र स्पर्धा, इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा, लेखन, पत्रकार परिषदा आणि टीव्ही/रेडिओवरील टॉक शो असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत . संपूर्ण देशभर चालणाऱ्या या महोत्सवाची टॅगलाइन “ग्रीन अॅड क्लीन एनर्जी‌द्वारे क्लीन एन्व्हायर्नमेंट” (हरित आणि स्वच्छ ऊर्जेचा अंगिकार करा आणि पर्यावरणास स्वच्छ बनवा) असे आहे . १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, रंगस्वर हॉल, मंत्रालयासमोर, मुंबई- ४०००२१ येथे उ‌द्घाटन समारंभा होणार आहे. पेट्रोलियम उत्पादनांच्या संवर्धनासाठी, इंधन कार्यक्षम उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पेट्रोलियम संवर्धनासाठी धोरणे आणि धोरणे प्रस्तावित करण्यात सरकारला मदत करण्यासाठी तेल विपणन कंपन्या (ओएमसी) आघाडीवर आहेत”.

अली दारुवाला म्हणाले, “सक्षम महोत्सव हा आपल्या देशाच्या ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने सुरु केलेला एक महत्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे.या कार्यक्रमाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे जीवाश्म इंधनावरील वाया जाणारा खर्च रोखणे, परकीय तिजोरीवरील वाढता भार कमी करणे आणि जीवाश्म इंधन जाळण्यामुळे निर्माण होणाऱ्या हरितगृह वायूंच्या प्रतिकूल परिणामांपासून पर्यावरणाचे संरक्षण करणे. तसेच अनेक पेट्रोल पंपावर देखील आपण जनजागृतीचे संदेश देणारे फलक लावणार आहोत”.

फोटो ओळ – हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद सावजी, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला