पतित पावन संघटना पुणे शहर तर्फे पुणे मनपा चे आयुक्त यांस निवेदन देण्यात आले
*पुणे महानगरपालिका हद्दित अनावश्यक विकास कांमांवरचा खर्च टाळून पुनेकरांच्या आरोग्य सेवेसाठी खर्ची करावा*
पुणे मनपा हि महाराष्ट्रातील *अ* वर्गात समाविष्ट असलेली मनपा आहे त्यानुसार नगरसेवकांनी या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात प्राथमिक स्वरूपाची आरोग्यसेवा नागरिकांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे परंतु पुणे मनपा चे नगरसेवकांना स्वतःची टक्केवेरीत तोटा होऊ नये यासाठी हे 2020 चे आर्थिक वर्ष संपल्या मुळे कंट्रातिंचे थकलेलेली बिले काढण्यात व्यस्त आहेत ह्या परिस्थित पुणे मनपा च्या आयुक्तांनी अनावश्यक विकासकामे करण्यापेक्षा तातडीने बेडची उपलब्धता ,व्हेंटिलेटर ,ऑक्सिजन या गोष्टीसाठी नागरिकांचे पैसे खर्च झाले पाहिजेत पण सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी अर्थपूर्ण मौन बाळगून बसले आहेत ज्या तातडीने आयुक्तांनी किरकोळ दुकानदार छोटे व्यावसायिक यांना घरी बसवले त्याच तातडीने फालतू विकास कामांना कात्री लावून पालिकेचा पैसा आरोग्य सेवेसाठी खर्च होईल ते पाहावे
वर्षातून दोनदा फुटपाथचे पेविंग ब्लॉक बदलले जातात, भिंती रंगवल्या जातायेत, एकाच पत्त्याच्या तीन तीन पाट्या लावल्या जातात, दोनच महिन्यात तुटणारे नित्कृष्ट दर्जाचे सुशोभीकरण केलं जातंय, 8 / 8 लाखाची बोलकी झाडे खरेदी करण्याचा घाट घातला जातोय, 7 दिवसात बंद पडणारे दिवे, लाखो रुपये खर्च करून पुलाची रोषणाई करण्यात प्रतिनिधी धन्यता मानत आहेत पुणेकरांना आज गरज नक्की कशाची आहे? रुग्णालयातील अपुरी औषधें
खाजगी हॉस्पिटलची लुटमारी
याच्यावर कोणाचेच लक्ष नाही नियंत्रण नाही नियोजन नाही आणि इच्छा शक्ती नाही जनवाडीतील महिला बेड अभावी प्राण सोडते यावर मौन बाळगले जाते, प्रतिनिधींचे परदेशी दौरे होत आहेत
तसेच गेल्या वर्षभरात आरोग्य सेवेवर किती टक्के खर्च केलात ते सुद्धा जाहिर करावे व लसीकरणतील वशीलेबाजि थांबवावी असे निवेदन पुणे जिल्हा अधिकारी, पुणे मनपा चे आयुक्त, महापौर, उपमहापौर, स्थायी समिति अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते व सर्व पक्षीय गटनेते यांना पतित पावन चे प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटिल, प्रांत संघटक सिताराम खाड़े, जिल्हा कार्यध्यक्ष विश्वास मनेरे, स्वप्नील नाईक, धनजंय क्षीरसागर, मनोज पवार, संतोष शेंडगे,विजय गावडे, विजय क्षीरसागर यांसतर्फे देण्यात आले