निना ललित ओसवाल यांनी कोरोना काळातील कामाची दखल ‘ *World Book Of Records,* *London* यांनी घेतली.. कोरोना काळात सर्व पातळीवर काम करत असताना याची नोंद ‘ *World* *Book* *Of Records, London* ‘ ने घेतली असून या कामाची नोंद म्हणून ‘ *Certificate Of Commitment* ‘ हे कामाची नोंद घेणारे प्रमाणपत्र *माननीय श्री कृष्णा प्रकाशजी,* *कमिश्नर ऑफ पोलिस PCMC* यांच्या हस्ते निना ललित ओसवाल यांना देण्यात आले. त्यांनी करोना काळात विविध कामे केली, त्यामध्ये धान्य वाटप असेल,रस्त्यावरील बेघर लोकांना जेवणाचे डबे देणे, राशन किट,मास्क वाटप असेल , आरोग्य शिबिर असेल,पेशंटला ने आण करण्या साठी अँबुलन्स उपलब्ध करून दिली,हॉस्पिटल मध्ये जागा मिळत नव्हती ती मिळवून देण्याचे काम केले, रुग्णांना औषधे मिळवून दिली, तसेच दुसऱ्या लाटे मध्ये हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नव्हती त्यावेळी स्वतः च तापुरत्या स्वरूपात कोविड सेंटर मध्ये जागा उपलब्ध करून दिली,रेमडीसीवर अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा करून मिळवून दिले,स्वतः लसीकरणासाठी लोकांची मदत केली. पोलिस आयुक्तालय येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस संस्थेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष महेबूब सय्यद सचिन ढेरे, ललित ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना निना ओसवाल यांनी आपण कोरोना काळात काम करत असताना पती ललित ओसवाल,कुटुंब आणि इतरांनी भक्कम पने साथ दिली याचे आभार मानून हा सन्मान सर्वांचा आहे असे प्रतिपादन केले. आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी संकट काळात सर्वांनी आपापल्या परीने इतरांना मदत करावी असे प्रतिपादन केले.निना ओसवाल या ह्युम मॅकहेंरी मेमोरिअल हायस्कूल सॅलसबरी पार्क येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत
छायाचित्र :नीता ललित ओसवाल यांना प्रमाणपत्र प्रदान करताना कृष्णप्रकाश व अन्य