“ सर्व सामान्य गृहिणी देखील आपल्या कौशल्याने विविध खाद्यपदार्थ व अन्य गरजेची उत्तम उत्पादने निर्माण करून स्वयंरोजगार करीत आहेत. या उत्पादनांना घरातीलच नव्हे तर बाहेरच्यांचा देखील चांगला प्रतिसाद मिळतो. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांनी आपला व्यवसाय हा अधिक वाढविण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा याबाबत आग्रह व प्रोत्साहन असते” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलमताई गो-हे यांनी केले. त्या खिलारेवाडी येथे भरलेल्या “खाद्य जत्रा व वस्तु विक्री प्रदर्शन भेटी प्रसंगी बोलत होत्या याचे आयोजन उपविभाग संघटिका शोभाताई सुर्वे यांनी केले होते.या कार्यक्रम प्रसंघी शोभाताई सुर्वे,पुणे शहर संघटिका सविता मते,प्रभाग संघटिका कांचना चुनेकर,शर्मिला येवले महाराष्ट्र राज्य युवा सेना विस्तारक,प्रज्ञा लोणकर उपशहर संघटिका,माया भोसले विधानसभा संघटिका,सलोनी शिंदे,वैभवी सूर्यवंशी,हेमंत धनवे शिवसेना उपविभाग प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.या एकदिवसीय प्रदर्शनात शाकाहारी,मांसाहारी खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने,आर्टिफिशियल ज्वेलरी आदींचे ४० हून अधिक स्टॉल्स होते.
छायाचित्र : खाद्य जत्रेतील कोंबडी वडे डिशची पाहणी करताना नीलमताई गो-हे,शोभाताई सुर्वे व अन्य.