संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या आदरणीय राजमाता श्रीमंत छत्रपती जिजाऊ महाराज साहेब यांच्या जयंती निमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते लालमहाल येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे,गजानन थरकुडे,नगरसेवक विशाल धनवडे,राजेंद्र शिंदे,सविता मते,युवराज पारिख,नागेश खडके,नेहा कुलकर्णी,अनीता परदेशी,प्रज्ञा लोणकर आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना डॉ.नीलम गो-हे म्हणल्या “राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार करून हिंदवी स्वराज्याची अस्मिता प्रत्यक्षात आणण्याचे कार्य केले.त्याचबरोबर करारीपणा, दृढनिश्चय,परिश्रम संपूर्ण पानाने समाज सुरक्षित राहावा यासाठी त्यांचे आयुष्य त्यांनी समर्पित केलेल होत.राजमाता जिजाऊ भोसले साहेब यांच्या माध्यमातून जी प्रबोधनाची परंपरा सुरू झाली ती आज देखील महाराष्ट्रात व पुण्यात समृद्धपणे टिकून आहे.
गोरगरिबांना न्याय देण्याच्या दृष्टीकोणातून कंत्राटी कामगारांना न्याय देण्यासाठी कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ तयार करावे असे निर्देश मी नुकतेच विधानपरिषदेत दिलेली आहेत.आणि मला खात्री आहे की मननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजितराव पवार, हे शरदराव पवार यांच्या मार्गदर्शनानुसार ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करतील.कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांची या संदर्भात सकारात्मक भूमिका आहे.कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून गोरगरीब,कष्टकरी,अंगमेहनती मजुरांना सुरक्षितता आणि न्याय देण्याचे निश्चित पणाने होऊन ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करणे हाच आमचा आजचा संकल्प आहे.”
छायाचित्र :पुष्पहार अर्पण करताना डॉ.नीलम गो-हे व अन्य मान्यवर