*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून अभिवादन* *‘चार दशकांमधील सामाजिक बदलांचा व महिलांवषयी जागृतीला शब्दबद्ध करणारे आत्मकथन लिहण्याचा डॉ. गोऱ्हे यांचा संकल्प*

Share This News

– “प्रबोधन, शिक्षण याच बरोबर समाजात महिलांसाठी प्रगतीची वेगवेगळी द्वारे खुली व्हावीत यासाठी महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले. आज एक दिवस मात्र सावित्रीबाई होऊन चालणार नाही तर प्रत्येक दिवशी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आज समाजाला गरज आहे.” अशा शब्दात विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सिल्व्हर रॉक्स निवासस्थानी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना डॉ गोऱ्हे म्हणाल्या, पुढील काही काळाने विविध निवडणूका आहे त्यामध्ये महिला मतदारांनी जागृतीने मतदान करावे. त्याच सोबत समाजात असलेले विविध प्रश्नवर एकोपा रहावा, समाजातील तेड दुर व्हावी अशी भावना ठेवते. ३ जानेवारी १९८० रोजी स्त्री आधार केंद्राची स्थापना करण्यात आली होती. केंद्राला ६७ वर्ष पूर्ण झाले असून ६८ व्या वर्षात पदार्पण करत आहोत. ज्या गोष्टीमुळे अभिमान स्त्री आधार केंद्राने ठेवावा ते म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात विना भ्रष्टाचार साक्षमपणे काम करणारी संस्था आहे. चार दशकांमधील सामाजिक बदलांचा व महिलांवषयी जागृतीला शब्दबद्ध करणारे आत्मकथन लिहण्याचा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त केला. अभिवादनाचे शिवसेना व स्त्री आधार केंद्र यांनी आयोजन केले होते. या प्रसंगी शिरीष फडतरे( शिक्षण शुल्क नियंत्रण समिति महाराष्ट्र राज्य),शेलार गुरुजी(ज्येष्ठ सल्लागार),अनिता शिंदे,मंगला पाटील,अनिता परदेशी,आश्लेषा खंडागळे,अनिता गावकरी,युवराज सिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र : पुष्पहार अर्पण करताना नीलमताई गो-हे व अन्य मान्यवर