*६५ व्या जागतिक महिला अधिवेशनास दुरदृश्य प्रणालीद्वारे सुरुवात, स्त्री आधार केंद्राचा सक्रिय सहभाग असणार… ना.डॉ.नीलम गोऱ्हे*

Share This News

पुणे दि. १४ : दरवर्षी जागतिक महिला अधिवेशन हे प्रत्यक्षात खूप मोठ्या उत्साहात होत असे परंतु  मार्च सन २०२० मध्ये कोव्हिडं-१९ च्या पार्श्वभूमीमुळे हे सत्र रद्द करण्यात आले होते. यावर्षी दुरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रम घेण्याची आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती तथा स्त्री आधार केंद्राच्या मानद अध्यक्ष ना.डॉ.नीलम गोऱ्हे ह्या प्रत्यक्ष द्रकश्राव्य प्रणाली द्वारे या कार्यक्रमातील अनेक परिसंवाद ,चर्चात  सहभागी होऊन भारताचे आणि महाराष्ट्राचे प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष प्रतिनिधित्व करणार आहेत. नीलम गोर्हे नी नुकतच  जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाचा  मराठी मध्ये लाईव्ह  संवाद देखील महाराष्ट्रातील जनतेसाठी केले होते.

*या 65व्या  जागतिक महिला अधिवेशनात स्त्री आधार केंद्राच्या वतीने ना.डॉ.गोऱ्हे आणि संस्थेच्या विश्वस्त जेहलम जोशी, अपर्णा पाठक ह्यांनी   ‘कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर शाश्वत विकासाची उद्दिष्टे आणि स्त्रीपुरूष समानता याबतची आव्हाने व त्यानुसार परिवर्तनाची गरज ” याविषयावर  जागतिक महिला अधिवेशनात समांतर कार्यक्रमाचे  आयोजन दि. २१ मार्च, २०२१ रोजी भारतीय वेळेनुसार सायं ६.०० वा करण्यात आले आहे*

संयुक्त राष्ट्र संघाच्या सामाजिक आणि आर्थिक परिषदेचा  भाग असलेल्या जागतिक महिला आयोगाचे ६५ वे सत्र १५ मार्च ते २६ मार्च  यादरम्यान न्यूयॉर्क येथील या सत्राचे जे मूळ मुद्दे आहेत त्याच्यामध्ये *समाजामध्ये महिलांचे आणि मुलींचे सक्षमीकरण, सर्व प्रकारची समानता, हिंसाचारापासून मुक्तता ही  साध्य होण्यासाठी व  चांगल्या प्रकारे समाजात व वैयक्तिक जीवनात  महिलांचा निर्णय प्रक्रियेत समृद्ध सहभाग हा सत्राचा मुख्य विषय आहे. यापुर्वी  २०१६ मध्ये शाश्वत विकासाची उद्दिष्टे आणि महिला सक्षमीकरण याच्याबद्दलचे सर्व देशांचे  मिळून साठाव्या अशाच सत्रात जे जागतिक करार झाले होते त्यांची प्रत्येक देशाने केलेल्या  अंमलबजावणीचा  आढावा* घेणे हा  देखील अग्रक्रम असणार आहे.
ह्या सगळ्याचा तपशील www.unwomen.org/en/csw652021  याच्या वरती  ऊपलब्ध होणार आहे .
स्त्री आधार केंद्रास जागतिक महिला आयोगाचा संस्था संलग्नता दर्जा गेली 24 वर्षे असल्याने याबाबतचे सर्व कार्यक्रम संस्थेने सातत्याने समाजात व प्रत्यक्ष सरकारकडे मांडले आहेत.  सर्व जगातील २६००० प्रतिनिधी या करारांच्या वरती गेली तीन महिने काम करत असुन त्याच्यावर सगळ्या देशांच्या सरकारांनी  चर्चा करुन  १ ऑक्टोबर २०२० ला २०२० ते २०३० हे डिकेड फाँर अँक्शन म्हणजेच कृतीदशक म्हणुन जाहीर केले आहे. त्यांनी वेगवेगळ्या बैठकांच्या   आधाराने या सत्रात वेगवेगळ्या विषयावर काम निश्चित केली. त्याच्यात  जागतिक स्तरावरती स्त्री –  पुरूष समानतेचे निकष कोणते असावेत ज्याच्या आधाराने आपण महिलांची महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्याच्या साठी विविध देशांनी केलेले कायदे, धोरण कार्यक्रम आणि त्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या सेवा या
याचा विचार औपचारिक सत्रात सरकारचे प्रतिनिधी मांडतील.सोबत युन विमेन, या संयुक्त राष्ट्रसंघाचा महिला विभागनेया बद्दलची धोरण आणि महिलांच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग त्यांच्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.

याखेरीज या एकूण जागतिक महिला परिषद असते त्याच्या आधाराने हा कार्यक्रम होतो त्याच्या मध्ये ४५ देशांची एक समिती असते आणि या ४५ देशांच्या मध्ये आफ्रिकन उपखंडामधले १३, पॅसिफिक मधले ११, अमेरिकन आणि कॅरेबियन स्टेट मधले ९ युरोप मधले ८ आणि पूर्व युरोपमधले  ४ यांचे  सभासदत्व झालेल आहेत.

जागतिक महिला आयोगाचे अध्यक्ष जे आहेत ते पूर्व युरोपमधल्या देशांचे आर्मेनिया या देशाच्या श्री.मेहेर मार्गा हे आहेत आणि उपाध्यक्ष आहेत. त्याच्यामध्ये आफ्रिकन स्टेट ग्रुप आफ्रिकन देशांच्या समुहा पैकी श्रीम.आलेंन सारा ह्या आहेत आणि अशिया पॅसिफिक च्या आ सांग देवो ,रिपब्लिक ऑफ कोरिया च्या, ऑस्ट्रेलियाच्या शिल्पा फुलेला आहेत.
हे सगळे एका बाजूला जागतिक स्तरावर घडत असताना जवळजवळ ६२५ समांतर अशी सत्रे  यामध्ये  आहे .या सत्रापैकी २० सत्रात स्त्री आधार केंद्र प्रतिनिधी सहभागी असतील.
विविध प्रकाराने  कोविड चा परिणाम काय झालेला दिसतो आणि भविष्यामध्ये कोविड ची परिस्थितीमध्ये आपल्याला समाजाच्या विविध घटकांच्या वरती काय परिणाम झालेला दिसतो ,मानवी अनैतिक व्यापार , महिलांविरोधी  होणारा  हिंसाचार, महिलांचे आर्थिक अधिकार त्याचबरोबर शिक्षणाचे भवितव्य, हवामान बदल, वर्णद्वेष विरोधी चळवळ, स्त्रीवादी चळवळ आणि होऊन कोविड १९ च्या काळामध्ये महिलांचा निर्णप्रक्रियेत  सहभाग, तरुण मुलींचे प्रश्न तसेच आरोग्यविषयक विविध  प्रश्न या कॉन्व्हर्सेशन सर्कल  त्याच्यावर  कार्य केलेले आहे.

विशेष म्हणजे स्त्री आधार केंद्र यांच्यावतीने *कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर शाश्वत विकासाची उद्दिष्टे आणि स्त्रीपुरूष समानता याबतची आव्हाने व त्यानुसार परिवर्तनाची गरज* आपल्याला असणाऱ्या चिंता आणि त्याच्यामध्ये आपण बजावलेली भूमिका त्याच्या बद्दलची चर्चा / स्त्री आधार केंद्राच्या वतीने दि. २१ तारखेला दुरदृश्य प्रणालीद्वारे   संध्याकाळी ६ ते ८ या वेळात आयोजित केलेली आहे.

त्याच्यामध्ये विविध देशांमधल्या महिला प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते येत्या संवादामध्ये स्वतःची भूमिका मांडणार आहेत .या परिसंवादात अध्यक्ष स्थान डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे आहे.या सत्रामध्ये स्त्री आधार केंद्राच्या जेहलम  जोशी ,अपर्णा पाठक आणि योगेश जाधव यांचा सहभाग आहे. कार्यक्रमात संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला विभागाच्या दक्षिण आशियाच्या माजी प्रमुख श्रीमती चांदनी जोशी(नेपाळ) तसेच  समाजविकास तज्ञ श्री.अजय झा, अपर्णा वायकर (चीन) त्याचबरोबर दक्षिण अमेरिका,द.आफ्रिका  येथील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. हे एक परस्परांमध्ये चर्चा होईल असे सत्र आहे. इंग्रजीतून मराठीत देखील भाषांतराची सोय केलेली आहे.तसेच स्त्री आधार केंद्राच्या  फेसबुक वरून ताबडतोबच काही तासांमध्ये याचे  दुरदृश्य प्रणालीद्वारे प्रसारण केले जाणार आहे. या परिसंवादाच्या मधून येणारे मुद्दे जे आहेत ते उपसभापती मा.ना. नीलम गोऱ्हे , मा.मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे तसेच पर्यावरण मंत्री  मा.श्री.आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा  केला जाईल. तसेच २०२० ते  २०३० हे जे कृतीदशक आहे त्याच्यासाठी केंद्र सरकारकडेही पाठपुरावा केला जाईल.