दौंड दि.०२ : कोरोना काळात निराधार महिलांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. दौंड तालुक्यातील पारगाव येथील निराधार महिलेने रेशन नसल्याबाबत विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांना दूरध्वनी करून आपली व्यथा मांडली. यानंतर ना.डॉ.गोऱ्हे यांनी दौंड येथील पारगाव गावातील निराधार महिलेला पुढील तीन महिन्यांच्या शिधा उपलब्ध करून देण्याची सूचना दौंडचे माजी तालुकाप्रमुख व मा. नगरसेवक श्री अनिल सोनवणे यांना केली.
तसेच ना.डॉ.गोऱ्हे यांनी उपसभापती कार्यालयाचे सचिव श्री रवींद्र खेबुडकर यांनी सदरील महिलेला संजय निराधार योजनेत नाव नोंद करण्याच्या दृष्टीने पाठवा करण्याची सूचना केली. यांनंतर तात्काळ त्यांच्या अर्जाबाबत कार्यवाही करण्याची सूचना तहसीलदार संजय पाटील यांना दिली. यांनंतर पूढील महिन्यापासून या महिलेला संजय निराधार योजनेतून मदत मिळणार आहे. या सर्वांबद्दल महिलेने ना.डॉ.गोऱ्हे यांचे आभार मानले. धान्याची मदत मिळाल्यानंतर महिलेला अश्रू अनावर झाले होते. यावेळी शिवसेना दौंड विधान सभा संघटक संतोष जगताप, उपतालुक प्रमुख श्री सदाभाऊ लकडे, रमेश निवांगुणे,सर्जेराव म्हस्के, विभागप्रमुख भाऊसो बोत्रे,शहर संघटक नामदेव राहिंज, हरीश खोमणे,देवेंद्र कानपिळे आदी उपस्थितीत होते. या वेळी श्रीमती शोभा अनंत यांनी शिवसैनिकांच्या माध्यमातुन भाऊबीज मिळाल्याची भावना बोलुन दाखवली या वेळी त्या खूप भावुक झाल्या होत्या.