डोळ्यांची निगा व नेत्रदान याबाबत “दृष्टी आणि दृष्टीकोन” हे व्याख्यान संपन्न.

Share This News

पुणे (दि.१५) नेहा जोशी फौंडेशन, ZTCC झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डीनेशन सेंटर (विभागीय अवयवदान समन्वय केंद्र) व रुबी हॉल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने डोळ्यांची निगा व नेत्रदान या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. “दृष्ठी आणि दृष्टिकोन” हे मार्गदर्शक व्याख्यान मित्रमंडळ सभागृह येथे संपन्न झाले. या कार्यक्रम प्रसंगी आयोजक राहुल जोशी (नेहा जोशी फौंडेशन संस्थापक), ZTCC च्या संगीता जाधव, रुबी हॉल क्लिनिकच्या लोचना जाधव, ऋषिकेश पराजंपे(संचालक परांजपे ऑप्टिशियन), पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे प्रदीप तुपे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना राहुल जोशी यांनी नेत्रदान ही काळाची गरज असून असंख्य दृष्टीहीन बांधवांना याचा लाभ होईल असे सांगितले, संगीता जाधव व लोचना जाधव यांनी नेत्रदान रुग्णाच्या मृत्यूनंतर केले जाते त्यामुळे मृतदेहावर- डोळ्यांवर कुठलीही निशाणी व्रण रहात नाही. आपल्या मृत्यूनंतर ही आपल्या डोळ्यांनी कोणीतरी जग पाहू शकतो असे सांगितले. हा कार्यक्रम परांजपे ऑप्टिशियन यांनी प्रायोजित केला होता
छायाचित्र : मार्गदर्शन करतांना राहुल जोशी.