“ पारंपरिक बँकिंग व्यवस्था किचकट असून योग्य व्यक्तींना देखील अर्थ पुरवठा नीट होत नाही.शरियातील बिनव्याजी कर्ज हे प्रामाणिक व गरजू व्यक्तींना कमीत कमी कागदपत्रांद्वारे मिळाल्यास, तसेच यात अर्थपूरवठा हा भागीदारी तत्वाने झाल्यास असंख्य गरजू उद्योजकांना लाभ होईल म्हणजेच धनिकांचा पतपुरवठा व कुशल उद्योजक यांची भागीदारी झाल्यास समाजाची तसेच देशाची प्रगती होईल”. असे प्रतिपादन नमो जैन ग्रुपच्या संजय जैन यांनी केले. मुस्लिम चेंबर्स ऑफ कॉमर्स च्या वतीने आयोजित “पतपुरवठा- नफा नुकसान भागीदारी प्रमाणे शरिया आधारित” या विषयावर बोलत होते. पुना क्लब येथील सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मुस्लिम चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष निसार सागर, उपाध्यक्ष नासिर शेख, सचिव जावेद सईय्यद, नमो जैन ग्रुपचे संजय जैन ,मोहन खटावकर, आदी मान्यवरांच्या बरोबरच मुस्लिम उद्योजक,युवक युवती उपस्थित होते.
छायाचित्र : मान्यवर व उपस्थित यांचे समूहचित्र.