*विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या साहित्य संमेलनात विविध प्रकाशकांच्या पुस्तकांच्या दालनांत भेटी आणि रसिकांशी अनौपचारिक संवाद*

Share This News

_स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी, उदगीर_

उदगीरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या मराठी साहित्य व संस्कृती या विषयावरील दालनाला सर्वप्रथम भेट दिली.

मराठी प्राचीन साहित्य आणि वांग्मय याबद्दलची माहिती साहित्य रसिकांसाठी लावल्याबद्दल त्यांनी राज्य शासनाचे विशेष अभिनंदन केले आहे.

यावेळी त्यांनी विविध साहित्यिकांच्या पुस्तकांचा आस्वाद घेतला.  संमेलनस्थळी असलेल्या अनेक प्रकाशकांच्या दालनाला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि पुस्तके खरेदी करून *पुस्तक दिनाचा एक आगळा वेगळा सुयोग साधला.*

पुण्यातील सुप्रसिद्ध प्रकाशक कै. अरुण जाखडे यांच्या पद्मगंधा प्रकाशन आयोजित पुस्तक स्टॉलला त्यांनी आवर्जून भेट दिली आणि त्यांचे चिरंजीव अभिषेक आणि स्नुषा यांच्याशी जाखडे सरांच्या प्रकाशन कार्याविषयी च्या आठवणींना उजाळा दिला. *स्त्री आधार केंद्राने नुकताच प्रकाशित केलेला कोविड काळातील विधवा महिलांच्या सर्वेक्षणाचा “स्वयंसिद्धा अहवाल” या स्टॉलवर ठेवण्यात आला.*

*विश्वकर्मा पब्लिकेशनच्या स्टॉलवर नीलमताईंच्या कार्यावर नुकतेच प्रकाशित झालेले अपराजिता हे पुस्तकही त्यांनी आवर्जून पाहिले आणि याबद्दल यांचे धन्यवाद व्यक्त केले.*

साहित्यनगरीतमध्ये फेरफटका मारताना त्यांनी राजहंस प्रकाशन,  वैशाली प्रकाशन, मैत्री पब्लिकेशन अशा विविध नामवंत साहित्यिकांच्या स्टॉल त्यांनी भेट दिली. यावेळी पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साहित्य रसिकांशी यांनी आवर्जून संवाद साधला.

यावेळी विविध साहित्य रसिक, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, महिला युवक वर्ग, युवती वर्ग नीलमताई सोबत सेल्फी घेण्यासाठी आग्रह धरत होते.  यावेळी या सर्वांनाच फोटो काढण्याचा आनंदही त्यांनी दिला.

आजही त्या अन्य साहित्यिकांच्या दालनाना भेट देणार असून विविध पुस्तके आणि प्रकाशने यांचा आनंद घेणार आहेत.