दि. : १७ फेब्रुवारी २०२५ तळेगाव-दाभाडे येथील माईर मायमर वैद्यकीय महाविद्यालयातर्फे दोन दिवसीय ८ वी आंतरराष्ट्रीय र्‍हायनोप्लास्टी कार्यशाळा संपन्न जगभारातून १०० हून अधिक नामवंत ईएनटी तज्ञांचा सहभाग

Share This News

पुणे दि. १७ – माईर एमआयटी, पुणेचे मायमर वैद्यकीय महाविद्यालय, तळेगाव-दाभाडे, श्री सरस्वती कराड रुग्णालय, कोथरुड आणि घैसास ईएनटी रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने ८ व्या आंतरराष्ट्रीय र्‍हायनोप्लास्टी कार्यशाळा दि. १४ ते १६ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान जे डब्ल्यू मॅरिएट, पुणे येथे संपन्न झाली. अशी माहिती श्री सरस्वती कराड रुग्णालयाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे, कोर्स डायरेक्टर डॉ. विरेंद्र घैसास यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. विरेंद्र घेसास म्हणाले, र्‍हायनोप्लास्टी अंतर्गत कॉस्मेटिक र्‍हायनोप्लास्टी, फंक्शनल र्‍हायनोप्लास्टी अशा विविध प्रकारच्या नाकाच्या शस्त्रक्रियांद्वारे नाकाचा आकार बदलण्यापासून नाकाचे विकार बरे करण्यासाठीच्या विविध शस्त्रक्रिया केल्या जातात.
या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत जगभरातील र्‍हायनोप्लास्टी संदर्भातील महत्त्वाच्या व अद्ययावत घडामोंडींबद्दल सखोल चर्चा करण्यात आली, तसेच, शस्त्रक्रियेची प्रात्यक्षिकेही दाखविण्यात आली.
तीन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत जर्मनीतील प्रा. डॉ. वुल्फगँग गुबिश व डॉ. सेबॅस्टिन हॅक, तुर्कीयेचेे डॉ. अब्दुल कादिर गोकसेल, रशियाचे डॉ. कान्स्टँटिन बी. लिपस्की, ओमानमधील डॉ. अब्दुल अजीझ अल जारी, तसेच मायमर मेडिकल कॉलेज व कोथरुड येथील आणि रुग्णालयाचे मुख्य समन्वयक डॉ. तुषार खाचणे, भारताचे डॉ. विरेंद्र घैसास यासारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक १०० हून अधिक नामवंत ईएनटी तज्ञांनी भाग घेतला.
या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेअंतर्गत दि. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी घैसास अ‍ॅडव्हान्स्ड ईएनटी अँड फेशियल अ‍ॅस्थेटिक्स या आपटे रोड येथील अद्ययावत रुग्णालयाचे उद्घाटन सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ डॉ. विश्वनाथ दा. कराड, प्रो. डॉ. गुबिश आणि श्रीमती मेधा घैसास यांच्या शुभहस्ते करण्यात आले.