मंदाकिनी डावरे यांच्या “महायाग” व “दो मुठ्ठी चावल”, पुस्तकांचे प्रकाशन

Share This News

लेखिका मंदाकिनी डावरे लिखित “महायाग” व “दो मुठ्ठी चावल” या दोन कादंबर्‍यांचे प्रकाशन डॉ. विनयकुमार डावरे व अरुंधती देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. महालक्ष्मी सभागृह पर्वती येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रकाशक विजय देशमुख, उदय कुलकर्णी अनंत देशपांडे आदी मान्यवरांच्या बरोबरच डावरे कुटुंबिय उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना लेखिका मंदाकिनी डावरे यांनी महायाग कादंबरीत अनिष्ट नरबळी रूढी विरुद्ध दक्ष सिन्हा या पत्रकाराने दिलेला लढा आहे तर दो मुठ्ठी चावल मध्ये धर्मांधते विरुद्ध जुम्मन या व्यक्तिरेखेने दिलेला लढा चित्रित केला आहे असे संगितले. डॉ.विनयकुमार डावरे यांनी पुस्तकांमध्ये लेखिकेचा व्यासंग, उत्साह व कल्पनाशक्ती ही उपजत दैवी देणगी असल्याचे प्रतिपादन केले. महायाग हे पुस्तक १४५ पानांचे असून किंमत १५० रुपये आहे. दो मुठ्ठी चावल हे पुस्तक १२८ पानांचे असून किंमत २२० रुपये आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत देशपांडे यांनी केले.  

छायाचित्र : डावीकडून विजय देशमुख,डॉ.विनयकुमार डावरे,अरुंधती देशमुख,मंदाकिनी डावरे.