पुणे (दि.१)विणकरांनी निर्मित केलेली रेशमी वस्त्रे थेट ग्राहकांना पुरवणाऱ्या कलाक्षेत्रम येथे पोंगल महोत्सव संपन्न झाला.या महोत्सवात सुमारे २० हजारांपेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. यातील १० महिलांना सोडत काढून शाही पैठणी भेट जाहीर करण्यात आली. यात सेल्फी व उखाणे स्पर्धा सुद्धा होती.त्यातील १० महिलांना सुद्धा भेट सोडतीद्वारे जाहीर करण्यात आली.लक्ष्मीरस्ता येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या शुभहस्ते ही सोडत काढण्यात आली. या प्रसंगी रोहन आयतम,हितेश आयतम,सागर पासकंटी, सचिन गरदास, विलास सातपुते,अंबर क्षीरसागर,राम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलतांना श्रुती मराठे यांनी कलाक्षेत्रम हे रेशमी वस्त्र दालन म्हणजे महिलांचे आवडीचे खरेदीचे ठिकाण,चित्रपटात काम करीत असतांना येथील साड्या देखील मी वापरणार आहे असे सांगितले.
छायाचित्र : कलाक्षेत्रम येथील पोंगल महोत्सव प्रसंगी मान्यवर.