आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ(इस्कॉन) आयोजित श्रीमद भागवत सप्ताह येथे गोवर्धन पर्वत पुजा संपन्न झाली. श्रीकृष्णाने इंद्र पुजा बंद केल्याने संतप्त इंद्राने गोकुळावर प्रचंड पाऊस पाडला यावेळी श्री कृष्णाने करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून गोकुळाचे रक्षण केले. ही कथा यावेळी सांगण्यात आली तसेच यात श्री कृष्णाच्या बाललीला, लोणी चोरी, पूतना व अन्य राक्षस वध कथा सांगण्यात आली. गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष शाम जाजू, रविंद्र माणियार, सुनील गेलडा, यशवंत मानखेडकर, कार्तिकेयन, उमेश देसाई, अनिल गेलडा, पुना ज्युनिअर कॉलेजचे ऊपमुख्याध्यापक श्री आगा, भुजंगराव ओगले, राजेश मित्तल, सुरेश खांडेलवाल,श्रीकांत मुछाल, राज मुछाल,हितेंद्र सोमाणी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व भाविकांनी सुद्धा गोवर्धन पूजन केले.
छायाचित्र : गोवर्धन पूजन करतांना प.पू कृष्णनामदास महाराज.