सध्याच्या कलीयुगात मनुष्य अत्यंत ताणतणावाचे व चिंताग्रस्त असे दुखी जीवन जगतो. यात भागवत कथा ऐकण्यास मिळणे हे परम भाग्याचे लक्षण असून त्याने सर्व पापे नष्ट होवून आपले व कुटुंबाचे कल्याण होते. योग मार्ग,ज्ञान मार्ग,ध्यान- तप मार्ग हे खूप कष्टाने साध्य होतात. मात्र भक्तिमार्ग हा सहज सोपा असून फक्त श्री कृष्ण-श्री राम नामस्मरणाने मोक्ष प्राप्त होतो. ईश्वर प्रती प्रेम म्हणजेच भक्तिमार्ग असे साडेपाच हजार वर्षांपूर्वी रचलेल्या श्रीमद भागवत या ग्रंथात सांगितले आहे. असे प्रतिपादन प.पू कृष्णनामदास महाराज यांनी केले. श्री कृष्णभावनामृत संघ(इस्कॉन) आयोजित भागवत सप्ताहाच्या पहिल्या दिवशी भागवत कथा महात्म्य सांगण्यात आले. गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी हितेंद्र सोमाणी, श्रीकांत मुछाल, राज मुछाल, राजेश मित्तल, राजेश मेहता, हंसराज किराड, पोपटशेठ ओसवाल, संजय ओसवाल आदी मान्यवरांच्या बरोबरच भाविक नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
छायाचित्र : उद्घाटन प्रसंगी मान्यवर. व कृष्णनामदास महाराज.