मिस्टर आणि मिस आयएफआरएम इंद्रा स्पर्धा संपन्न

Share This News

पुणे (दि.१२) मिस्टर आणि मिस आयएफआरएम इंद्रा स्पर्धा नुकतीच पंडित जवाहरलाल सांस्कृतिक भवन येथे उत्साहात संपन्न झाली. कविता कोठारी यांच्या मातोश्री श्रीमती इंद्रकुवर कोठारी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला गेला. कार्यक्रमाचे आयोजन कविता कोठारी यांनी केले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाने आपली उत्कृष्टता सदर करत प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमात पारंपारिक आणि पाश्चात्य वेशभूषा,व्यक्तिमत्व विकास आणि विविध फेऱ्यामधून स्पर्धकांचे कौशल्य तपासले गेले. अंजली जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्पर्धकांचे सादरीकरण अतिशय उत्तम झाले. मिस्टर अँड मिस आयएफआरएम इंद्रा स्पर्धेत स्पर्धकांनी आपल्या आत्मविश्वासाने,स्टेजवरच्या उत्तम वावराने आणि आकर्षक सादरीकरणाने सर्वांना प्रभावित केले. परीक्षक मंडळाने अत्यंत बारकाईने परीक्षण करून विजेत्यांची निवड केली. प्रमुख विजेते रुपाली अभंग आणि सुकृत सरनोबत ठरले. उपविजेते पुढील प्रमाणे.—अंजली गांधी, पूर्वा जोशी, रामेश्वर शिंदे, डॉ.सचिन जाधव, तर उत्तेजनार्थ पारितोषिक पुढील विजेते—उदय चौगुले, वैशाली नेमाडे ,साधना देशपांडे, किशोर ठक्कर, सतीश आडके. कविता कोठारी आणि IFRM यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सादर केला गेला. यासाठी IFRMचे संस्थापक व मेंटोर दीपक महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अपर्णा ताटके,पूनम कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यात मोलाचा वाटा उचलला, अशा प्रकारचा आगळा वेगळा कार्यक्रम प्रथमच सादर झाला त्यामुळे त्याचे विशेष कौतुक होत आहे. अंजली जोशी, करुणा पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.
छायाचित्र : मान्यवर व विजेते यांचे समूहचित्र.