संगणक तज्ञ व सल्लागार “हेमंत देशपांडे यांच्या “ए टु झेड आय टी,गाईड ऑफ बेनीफिटस अँड कंप्लायन्स फॉर आय टी अँड आयटीईज कंपनीज इन इंडिया” पुस्तकाचे प्रकाशन. राजमाता जिजाऊ महाविद्यालय येथे संपन्न झाले.या कार्यक्रम प्रसंगी लेखक हेमंत देशपांडे(अध्यक्ष LLMCA),दत्तात्रय खलीपे(खजिनदार LLMCA),सत्यवान फडतरे(सचिव LLMCA),प्रदीप तुपे (उपाध्यक्ष PMA), हिमांशु नाईक (प्रमुख वक्ते)प्रा.धनंजय बागूल(राजमाता जिजाऊ महाविद्यालय),प्रा. व्ही एस पाटील(राजमाता जिजाऊ महाविद्यालय).आदी मान्यवर व सल्लागार मोठ्या संखेने उपस्थित होते. प्रथम आमदार विलास लांडे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी हिमांशु नाईक यांनी आपल्या भाषणात कामगार कायदे व तंटा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. हेमंत देशपांडे यांनी आय टी कायदे व विविध फायदे याबाबत सर्वांना माहिती व्हावी यासाठी हे पुस्तक लिहिल्याचे संगितले.पुस्तकाची पाने ९४ असून किमत १५० आहे.
छायाचित्र : डावीकडून मनीष शेठ,दत्तात्रय खलीपे,सत्यवान फडतरे,हिमांशु नाईक,हेमंत देशपांडे,प्रदीप तुपे,राजेश बिडकर।