एच बी सी विसा फाउंडेशन च्यावतीने अनाथ मुला मुलींसाठी “पावनखिंड”.या प्रेरक चित्रपटाचे आयोजन करण्यात आले. ९६ मुलामुलींनी याचा आनंद घेतला. याचे आयोजन एच बी सी विसा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल आगरवाल व सतीश शिंदे यांच्या ग्रुपने केले. हडपसर येथील ९३ अव्हेन्यु मॉल येथिल सिनेमा गृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. पावनखिंड या ऐतिहासिक लढ्याची माहिती मिळावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे आयोजकांनी नमूद केले. मुलामुलींना खाऊ देण्यात आला.
छायाचित्र : आयोजक व मुले मुली यांचे समूहचित्र