जायंट्स ग्रुप ऑफ पुणे मेन च्या अध्यक्षपदीडॉ.राजेंद्र भवाळकर.

Share This News

पुणे (दि.४) जायंट्स वेलफेअर फौंडेशन या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या नूतन शाखेचा पदग्रहण व शपथविधी सोहळा पुणे येथे संपन्न झाला.जायंट्स ग्रुप ऑफ पुणे मेन (Giants Grup of Pune Main) या नावाने स्थापन झालेल्या या संस्थेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते डॉ.राजेंद्र भवाळकर यांची नियुक्ती झाली असून सुनीता बांदल यांची सचिव पदी नियुक्ती झाली,उपाध्यक्षपदी मा.दिलीप भिकुले व सौ.रेश्माताई पोकळे यांची नेमणूक झाली.या कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक व ग्रामीण कथाकार श्री बबन पोतदार प्रमुख पाहुणे होते. IGT सोल्युशन्सचे व्हाईस प्रेसिडेंट जॉन यगाटी हे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या प्रसंगी बोलतांना नवनियुक्त अध्यक्ष डॉ.राजेंद्र भवाळकर यांनी साक्षरता प्रसार, कॅन्सर जनजागृती,महिला सबलीकरण,ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविणे आदी उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिनी बांदल यांनी केले.आभार प्रदर्शन रसिका भवाळकर यांनी केले. छायाचित्र : डॉ.राजेंद्र भवाळकर.