पुणे (दि.१२)गतका(भारतीय पारंपारिक खेळ) हा खेळ नॅशनल गेम्स,खेलो इंडिया ऑल इंडिया इंटर युनिव्हार्सिटी,स्कूल गेम्स ऑफ इंडिया या सर्व स्पर्धांमध्ये खेळला जातो. असोसिएशन ऑफ गतका महाराष्ट्र व शिवसेना पुणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त गतका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यात महाराष्ट्रभरातून १७ जिल्ह्यांतून सुमारे १७० स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांक पुणे शहर संघाने पटकवला,द्वितीय क्रमांक कल्याण डोंबिवली संघाने मिळवला.तृतीय क्रमांक कोल्हापूर संघाने तर चतुर्थ क्रमांक रायगड संघाने मिळवला.स्मृती चषक असे बक्षिसाचे स्वरूप होते.शाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह स्वामी विवेकानंद पुतळा येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आयोजक शिव कामगार आघाडी अध्यक्ष सुधीर कुरुमकर, असोसिएशन ऑफ गतका महाराष्ट्र अध्यक्ष संतोष चौधरी,जनरल सेक्रेटरी प्राध्यापक आरती चौधरी(आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक),सारथीचे महासंचालक अशोक काकडे,सहाय्यक शिक्षण संचालक विलास कदम,आदी मान्यवरांच्या बरोबरच पालक व स्पर्धक उपस्थित होते. विशेष ट्रॉफी विजेते पुढील प्रमाणे बेस्ट प्लेअर ट्रॉफी फेरीसोटी खेळ – मुले स्मित निलेश चौधरी व मंथन कृष्ण पवार,मुलींमध्ये वर्तिका पाटील पिंपरी चिंचवड. सिंगल सोटीखेळ मुले – अथर्व नलावडे व धीरज कोट कल्याण डोंबिवली, मुलींमध्ये जिज्ञासा पाटील रायगड. या प्रसंगी बोलतांना अशोक काकडे यांनी शासन या खेळाडूंसाठी विविध योजना राबविणार आहे असे सांगितले. सुधीर कुरुमकर यांनी महिलांना स्वसंरक्षण तसेच पारंपारिक खेळांतून आरोग्य व कौशल्य विकास याचा लाभ मिळतो असे सांगितले. छायाचित्र : सहभागी स्पर्धक व मान्यवर,पालक यांचे समूहचित्र.