डॉ.इरफान छेरावाला – डेन्टल सर्जन व कौन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट यांना किडलेल्या दातांवर भारत सरकारचे मिरॅकल – ३२ डेंटल ट्रिटमेंट हे प्रोव्हिजनल पेटंट मिळाले आहे. डॉ.इरफान छेरावाला हे गेली २५ वर्ष पुण्यात दातांचा दवाखाना चालवत आहेत.गेली २२ वर्ष त्यांनी संशोधन व ४००० पेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत.किडलेला डाट दुखत असेल तर दातांचे डॉक्टर रूट कॅनॉल करतात किंवा तो दातकाढून टाकतात यासाठी कधी कधी शस्त्रक्रिया करावी लागते.यात रूग्णाला इंजेक्शन तसेच कीड काढायच्या ड्रिलची भीती वाटते.मात्र मिरॅकल – ३२ डेंटल ट्रिटमेंटने दातांची किड निघून जाते आणि रूट कॅनॉल न करता,दात न काढता रुग्ण व्यवस्थित चाऊ शकतो आणि जेवण करू शकतो.या ट्रिटमेंट मध्ये दाताचे आजूबाजूच्या हिरडी,हाड,नसा आणि संपूर्ण सिस्टिमची मानसिक,शारीरिक रसायनिक आणि औषधोपचार यांनी दुखत असलेला – किडलेला दात ठीक केला जातो. अनेकदा रूट कॅनॉल फेल झाली तरी दात काढायची गरज पडत नाही. या ट्रिटमेंटचे अनेक फायदे आहेत.ज्या रुग्णांना उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असेल त्यांना जखम भरण्याची भिती वाटते,काही रुग्णांचे तोंड तंबाखू,मिश्री,गुटका सिगारेट मुळे उघडत नाही अशा सर्व रुग्णांवर या पद्धतीने उपचार करता येतो.कॅन्सर रुग्णास दात काढल्यास नुकसानीची भिती असते,तर गरोदर स्त्रियांवर क्ष किरण वापरता येत नाही,व गोळ्या सुद्धा देता येत नाहीत,कारण दात काढायचा असेल तर यात आई व बाळ दोघांना इजा होवू शकते.अशा वेळी मिरॅकल – ३२ डेंटल ट्रिटमेंटने फायदा होतो.व अनेक रुग्णांचे दात ठिक झाले आहेत.यामुळे रुग्णाचा जीव व पैसेही वाचतात. अशा असंख्य रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे.
छायाचित्र :डॉ.इरफान छेरावाला.