कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या स्मरणार्थ कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या “चित्रपट महोत्सवात” डॉ.दिलीप आबनावे यांच्या “SAVE WATER’ सेव्ह वॉटर या चित्रपटाची निवड करण्यात आली. भारतीय दररोज एक धरणभर पाणी कसे वाया घालवितात, पाण्याचे जीवनात महत्व व रोजच्या जीवनात पाणी कसे वाचविता येईल यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, फोटोग्राफी, संगीत, भूमिका सर्व डॉ.दिलीप आबनावे यांची आहे. या कार्यक्रम प्रसंगी चित्रपट क्षेत्रांतील दिग्गज दिग्दर्शक व कलावंत प्रकाश ओक यांच्या बरोबरच अभिनेत्री अंशुमाला पाटील, ज्येष्ठ दिग्दर्शक सतीश रणदिवे, पितांबर काळे, निर्मात्या स्मिता चव्हाण आदी मान्यवरांच्या बरोबरच या क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
छायाचित्र : डॉ दिलीप आबनावे.