पुणे (दि.११) रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट व रोटरी क्लब बावधन एलिट यांच्या संयुक्त विद्यमाने शिरगाव (मावळ) येथील शारदाश्रम प्राथमिक आश्रमशाळेस ७.५० लाखाचे सांडपाणी प्रक्रिया संयंत्र नुकतेच प्रदान करण्यात आले.सदर प्रकल्प वोल्टर्स क्लूवर इंडिया या कंपनीच्या सामाजिक बांधिलकी मधून देण्यात आले आहे.या प्रकल्पातून सांडपाण्यावर पेटंट प्राप्त प्रक्रीयेनुसार पाणी शुद्ध करण्यात येईल व या पाण्याचे झाडांकरिता व स्वच्छतागृहा करिता पुनर्वापर करण्यात येईल जेणेकरून पाण्याची बचत होईल,या प्रकल्पाचे हस्तांतरण रोटरी जिल्हा ३१३१ च्या प्रांतपाल रो.मंजू फडके यांच्या हस्ते झाले,या दोनी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.विपिन घाटे,रो.योगेश भंगाळे,शिरगाव येथील साईबाबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार प्रकाश देवळे,विश्वस्त सपना लालचंदानी रवी जाधव,व प्रकल्प तंत्रज्ञान निर्माते राजेंद्र सराफ,रो.चारू श्रोत्री,स्मिता शिरोळे,सुचिता जगवाणी, व मोठ्या संखेने रोटरी सदस्य उपस्थित होते.या प्रसंगी बोलतांना प्रांतपाल मंजू फडके यांनी पर्यावरण रक्षणासाठी असे आजून प्रकल्प आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.श्री प्रकाश देवळे यांनी रोटरीच्या कामाचे कौतुक करून हे काम कायम समाधान देणारे आहे असे सांगितले.
छायाचित्र : प्रकल्प हस्तांतर प्रसंगी मान्यवर.