रोटरी प्रांत ३१३१ च्या वतीने गृहनिर्माण संस्थांसाठी “ग्रीन सोसायटी” प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या मधील पहिला मेळावा रविवार दिनांक १० सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता कामिन्स इंजिनियरिंग कॉलेज कर्वनगर पुणे ५२ येथे संपन्न होणार आहे. पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरण पूरक प्रकल्पाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे पुणे, पिंपरी –चिंचवड व पनवेल या ठिकाणी गृहनिर्माण संस्थांचे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. मेळव्यांमध्ये या क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था व तज्ञ गृहनिर्माण संस्थांना मार्गदर्शन करतील. ज्या गृहनिर्माण संस्था असे प्रकल्प सध्या करत आहेत किंवा मार्च २०२४ पर्यंत काम करतील त्यांना रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे रोटरी पर्यावरण पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यासाठी संस्थांनी ऊर्जा बचत, पाणी बचत, कचरा व्यवस्थापन, वृक्ष संवर्धन आणि असेच इतर ह्या पैकी कमीतकमी एक क्षेत्रामध्ये प्रकल्प राबवणे किंवा सुरू करणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी रोटरी बरोबरच पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघ, ईकॉलॉजिकल सोसायटी IGBC ह्या संस्था सहयोगी म्हणून सहभागी होत आहेत. तरी रविवार १० सप्टेंबर रोजी कामिन्स इंजिनिअरिंग कॉलेज येथे होणार्या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रकल्प संचालक केशव ताम्हनकर व सहसंचालक संतोष जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकात केले आहे.
रोटरी तर्फे गृहनिर्माण संस्था पर्यावरण संवर्धन मेळावा १० सप्टेंबर रोजी.
Tags: #aaj ka anand, #lokmat, #loksatta, #maharashtra times, #pudhari, #punya nagri, #rotary dist 3131, #sakal, #samna