रोटरी क्लब हेरिटेज आयोजित मंगळागौरी स्पर्धा नाशिकच्या झिम पोरी जिम संघाने जिंकली. रोटरी क्लब हेरिटेजने “श्रावण सरी” ही पाककृती व मंगळागौरी स्पर्धा आयोजित केली होती यात सुमारे १७० महिलांनी सहभाग घेतला. राष्ट्र सेवा दल दांडेकर पूल येथील सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब हेरिटेजच्या अध्यक्ष स्वप्ना कानिटकर,सचिव पुरुषोत्तम बापट,कविता अभ्यंकर ,प्रमुख पाहुण्या स्वाती दैठणकऱ(भरत नाट्य नृत्यांगणा)सेफ पराग कान्हेरे,शैलजा भोंजाळ,सहाय्यक प्रांतपाल प्रशांत सिद्ध, आदी मान्यवरांच्या बरोबरच सहभागी महिला व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संखेने उपस्थित होते. महिलांच्या कला गुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे स्वप्ना कानिटकऱ यांनी नमूद केले. (पाककृती स्पर्धात गोड पदार्थ प्रथम क्रमांक विद्या ताम्हणकर,द्वितीय क्रमांक प्रतिभा जायदे,तिखट पदार्थ प्रथम क्रमांक वर्षा धोंडीबा,द्वितीय क्रमांक सीमा नलावडे.).
छायाचित्र : मान्यवर व विजेते स्पर्धक यांचे समूहचित्र