रोटरी क्लब फिनिक्सच्या हिरे हायस्कूल मधील इंटरॅक्ट(बाल रोटरी) क्लबचा चौथा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे मोहन पुजारी, प्रज्ञा डांगे, रोटरी क्लब फिनिक्सचे अध्यक्ष डॉ.समीर डोलारे, सचिव अॅड.माधव सोमण, डायरेक्टर न्यू जनरेशन स्वप्नील देशपांडे, क्लबचे सभासद यांच्या उपस्थितीत ६५ विद्यार्थ्यांनी इंटरॅक्ट क्लबचे सभासदत्व स्विकारले. २३-२४ या रोटरी वर्षासाठी आरती दाभाडे हिची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ फिनिक्स नेहमीच हिरे हायस्कूल मधील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कार्यरत राहिला आहे. असे समीर डोलारे यांनी यावेळी नमूद केले.
छायाचित्र : मान्यवर व इंटरॅक्ट यांचे समूह चित्र